26 ऑगस्टपासून एक थेंब ही पेट्रोल मिळणार नाही

petrol
मुंबई : व्हॅटचे दर कमी करणे आणि समान एलबीटी लागू करण्याच्या मागणीसाठी 26 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व्यापारी बेमुदत आंदोलन करणार आहेत.

राज्यातील 4 हजार 462 पेट्रोलपंपचालकांनी पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा एलबीटी, स्टेट स्पेसिफिक कॉस्ट आणि व्हॅट करासंदर्भात विविध मागण्या करीत 26 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे.

फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन या पेट्रोलपंप मालकांच्या संघटनेने या मागण्या पूर्ण झाल्यास राज्यातील वाहनचालकांसाठी पेट्रोलचे दर 5 ते 6 रुपयांनी कमी होतील, असा दावाही केला आहे.

Leave a Comment