
सोलापूर – निवासी डॉ.किरण जाधव यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून सोलापूर मधील शासकीय रुग्णालयात आत्महत्या केली होती. याच्या निषेधार्थ मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आजपासून राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे.
मार्डचा डॉक्टरच्या आत्महत्येच्या निषेधार्थ संप
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ.जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत असल्यामुळे सरकारने निवासी डॉक्टरांच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे.
मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही सरकार दरबारी मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारण्यात आला आहे.
