
ग्लासगो – राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकीमध्ये पुरुष गटात मंगळवारी भारताला ऑस्ट्रेलियाकडून २-४ असे पराभूत व्हावे लागले. सामन्यात पहिल्यापासूनच ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले होते. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने तीन गोल केले तर भारताला केवळ एक गोल करण्यात यश आले.
राष्ट्रकुल स्पर्धा ; हॉकीमध्ये भारताचा पराभव
दुस-या सत्रातही ऑस्ट्रेलियाला विजयी आघाडी कायम राखण्यात यश आले. दुस-या सत्रात भारताकडून गोल करण्याचे बरेच प्रयत्न झाले मात्र ऑस्ट्रेलियाने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. भारतातर्फे दोन्ही गोल रमणदीप सिंगने केले. प्रतिस्पर्ध्यांच्या चार गोलांत ख्रिस सिरिएलोच्या पेनल्टी कॉर्नरवरील दोन गोलांचा समावेश आहे. दोन लढतीनंतरचा भारताचा हा पहिलाच पराभव आहे.याआधी भारताने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात वेल्सवर विजय मिळवला होता. त्यानंतर स्कॉटलंडला पराभूत केले होते.
