कोयनेत ५४.२७ टीएमसी पाणीसाठा

koyna-dam
कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात चोवीस तासांत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कोयनानदी दुथडी भरून वाहू लागल्याने नदीवरील कमी उंचीचा संगमनगर धक्का येथील पूल पुन्हा पाण्याखाली गेल्यामुळे नदीच्या दक्षिण तीराकडेची सुमारे ३५ गावे, वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे. कोयना धरणात ५४.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे १२६ (२५0७ मि.मी.), नवजा येथे २८0 (३0८९ मि.मी.) आणि महाबळेश्‍वर येथे ९६ (२२४७ मि.मी.) पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे. आज पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या दमदार पावसामुळे धरणात येणार्‍या पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात दोन टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची आजची जलपातळी २११२.१ फूट झाली असून धरणात ५४.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सोमवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची संततधार कायम राहिली असून दिवसभरात कोयना येथे ७५ मि.मी., नवजा येथे ९५ मि.मी. आणि महाबळेश्‍वर येथे ५0 मि.मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्यामुळे कोयना आणि काफना नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहू लागल्याने संगमनगर धक्का येथील कमी उंचीचा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे.

Leave a Comment