
नवी दिल्ली – सत्ताधारी भाजपने स्विस बँकेतील काळ्या पैशाच्या मुद्यावरुन लोकसभा निवडणुकीदरम्यान चांगलेच रान पेटवले होते. या प्रकरणी नरेंद्र मोदींनीही काही वक्तव्ये केली होती. पण त्यांचेच खासदार त्यांच्या आश्वासनांमधील हवा काढून घेण्याचे काम करत आहेत. झारखंडच्या गोड्डामधून निवडून आलेले भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत ‘स्विस बँकेतून काळा पैसा परत आणणे शक्य नसल्याचे वक्तव्य केले.’ विशेष म्हणजे त्यांनी जेव्हा हे वक्तव्य केले तेव्हा अर्थमंत्री अरुण जेटली हे सभागृहात उपस्थित होते. दुबेंच्या वक्तव्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
‘या जन्मातरी काळा पैसा परत आणणे अशक्य’
मोदी सरकारने सत्तेवर येताच काळा पैसा परत आणण्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली होती. अरुण जेटलींनीही स्विस सरकारला पत्र लिहून काळापैसा जमा करणा-या भारतीयांबाबत माहिती मागवली होती.
