तेजीत असलेल्या शेअरबाजारात घसरण

share-market
मुंबई – शेअर बाजाराजच्या निर्देशांकामध्ये मागच्या काही दिवसांपासून तेजीत होता पण आज त्यात घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरु होताच २५ अंकांची घसरण नोंदवली.

गुरुवारी सेन्सेक्समध्ये १२५ अंकांची वाढ झाली आणि तो २६,२७१.८५ वर बंद झाला होता. मागच्या आठ सत्रांमध्ये १२६४.८७ अंकांची वाढ नोंदवणा-या निर्देशांकामध्ये २५.१५ अंकाची घसरण झाली आहे.

बीएसई सेन्सेक्सच्या या घसरणीचा परिणाम राष्ट्रीय शेअर बाजारावरही झाला. व्यवहार सुरु झाल्यानंतर ७८४०.९५ वर जाऊन पोहोचलेल्या निफ्टीमध्ये २० अंकांची घसरण झाली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणावर खरेदी केल्यामुळे मागच्या आठ सत्रात निर्देशांकात वाढ झाली होती. बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

Leave a Comment