आता सोनिया दरबारी जाणार नाराज राणे

rane
मुंबई – आता आपले गाऱ्हाणे थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनियांच्या समोरच काँग्रेस पक्षात नाराज असलेले नाराज नारायण राणे मांडणार आहेत. नाराज राणेंनी स्वतःच ही माहिती आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर तोफ डागत राजीनामा देणाऱ्या नारायण राणेंसोबत आज मुख्यमंत्री, आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी बैठक घेतली आहे. नारायण राणेंनी या बैठकीनंतरही कोणताच तोडगा निघाला नसल्याचे म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी काल राजीनामा दिल्यानंतर आपल्याला बैठकीचे निमंत्रण दिले होते. असे सांगत नारायण राणे म्हणाले, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस हायकमांडपुढे आपले म्हणणे मांडण्यात येणार आहे.

राजीनाम्यात नमुद केलेले सर्वच मुद्दे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या समोर मांडण्याचे आज झालेल्या बैठकीत ठरले आहे. सुमारे अडीच तास चालेल्या बैठकीत नाराज राणेंची समजुत न निघाल्याचेच दिसत आहे.

काँग्रेसची वाटचाल पराभकडे असल्याचा आरोप करत नारायण राणेंनी काल राजीनामा दिला आहे. अद्याप तो राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. तसेच आजच्या बैठकीत आपल्याला कोणतीही ऑफऱ देण्यात न आल्याचे राणे म्हणतात.