सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर आमदार सुरेश जैन

sunesh-jain
धुळे- घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी, आमदार सुरेश जैन सहा महिन्यांनी तुरुंगाबाहेर आले. सोळा दिवसांसाठी पॅरोलवर धुळे न्यायालयाने त्यांची सुटका केली.

१६ जानेवारीपासून धुळे कारागृहात असलेल्या जैन यांना गेल्या आठवड्यात धुळे विशेष न्यायालयाने २१ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत वैद्यकीय रजा मंजूर केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ठीक ८.४५ वाजता ते कारागृहाबाहेर पडले. त्यानंतर कारागृहाच्या आवारात असलेल्या उजव्या गल्लीत ते वळले. या ठिकाणी चंदेरी रंगाची कार सकाळपासून उभी होती.

प्रवेशद्वारापासून कारपर्यंत अवघ्या तीन मिनिटांत पोहोचल्यावर सकाळी ठीक 8.48 वाजता जैन यांची कार जेलरोड, धुळे तहसील कार्यालयमार्गे रवाना झाली. तत्पूर्वी ८.३० वाजता धुळे पोलिस मुख्यालयातून दोन कर्मचारी त्यांच्या सुरक्षा व बंदोबस्तासाठी कारागृहात आले होते.

Leave a Comment