
मुंबई : मुंबईतील लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीत नितीन इवलेकर शहीद झाले. आता लवकरच अंत्यसंस्कार होणार आहेत.सरकारी नोकरीची लेखी हमी इवलेकर यांच्या पत्नीला देण्यात आली आहे. तसेच महिन्याभरात मदतीची रक्कम देण्याचे आश्वासन चीफ फायर ऑफिसर ए.एन.वर्मा यांनी दिले आहे.
इवलेकर यांच्या पत्नीच्या मागण्या मान्य, लवकरच अंत्यसंस्कार
इवलेकर यांची पत्नी शुभांगी यांनी सरकारी नोकरी आणि अग्निशमन दलातील जवानांसाठी सुरक्षित युनिफॉर्मची मागणी केली होती. दरम्यान जोवर लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत नितीन इवलेकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्य़ास त्यांनी नकार दिला होता.
त्यामुळे नितीन इवलेकरांचे पार्थिव पुन्हा एकदा भायखळा फायर स्टेशनकडे आणण्यात आले. मात्र आता सरकारी नोकरीचे लेखी आश्वासन शुभांगी यांना देण्यात आले आहे.
