संघ भाजपला विधानसभा निवडणुकीत करणार नाही मदत

amit-shah
नागपूर – सरसंघचालक मोहन भागवत यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या अमित शाह यांना स्पष्टपणे निर्णय सांगितला असून महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या निवडणुकांतही संघाकडून मदत केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे अध्यक्ष बनल्यानंतर प्रथमच संघ मुख्यालयात पोहोचलेल्या अमित शाह यांना संघाच्या भूमिकेमुळे मोठी निराशा हाती आली आहे.

पक्षाचे ‘मास्टर रणनीतीकार’ शाह यांना भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, लोकसभा निवडणुकांमध्ये आरएसएसने भाजपला मोठी मदत केली होती. त्यामुळे भाजपला ऐतिहासिक बहुमतही मिळाले. पण त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी देशात बिकट परिस्थिती होती आणि त्यामुळे एका मजबूत सरकारची गरज होती. पण आता संघावर अवलंबून राहण्याऐवजी पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला भागवत यांनी शाह यांना दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करण्याबरोबरच महाराष्ट्राती निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती मजबूत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Leave a Comment