
मुंबई – बहुप्रतीक्षेत असलेली पश्चिम रेल्वेवरील ‘एसी’ लोकल डिसेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. ही लोकल सुरक्षेबाबतच्या संपूर्ण चाचण्या पूर्ण झाल्या नंतरच सेवा सुरू करणार आहे. तसेच आरामदायी लोकलही लवकरात लवकर सुरू होणार असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत दोन नव्या ‘बम्बार्डियर’ लोकलही सुरू करणार आहे.
डिसेंबरमध्ये मुंबईत धावणार एसी लोकल
ही ‘एसी’ लोकल जुलै किंवा ऑगस्टमध्येच येणार होती. पण या लोकलसाठी आवश्यक असणारे सुट्टे भाग येण्यास उशिर लागल्यामुळे या लोकलसाठी वाट पाहावी लागणार आहे. शक्य तितक्या लवकर आम्ही या एसी लोकलला सेवेत आणण्याचे प्रयत्न करणार आहोत, असे रेल्वेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांनी सांगितले आहे.
या लोकलचे तिकीट अद्याप ठरलेले नसून बोरीवली ते चर्चगेट मार्गावर धावणार आहे. तसेच पासची कोणतीही योजना या लोकलमध्ये नाही, असे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले. इतर लोकलप्रमाणे यात कोणताही विशेष डबा नाही. मेट्रोप्रमाणेच ही लोकल सलग राहणार आहे.
