फिलिप लाम आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

Philipp-Lahm
बर्लिन – फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा कर्णधार फिलिप लाम याने आज आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा निरोप घेत देशाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाल्याने, अत्यंत अभिमानाने आपण निवृत्त होत असल्याची भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

२४ वर्षांपासून जर्मनीचे फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न यंदा पूर्ण झाले आहे. जर्मनीच्या जिगरबाज वीरांनी ब्राझिलमध्ये दर्जेदार सांघिक कामगिरी करून विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. फिलिप लामने या संघाच्या नेतृत्वाची धुरा मोठ्या जबाबदारीने सांभाळत अभिमानाने वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली. हा त्याच्या कारकीर्दीतील परमोच्च आनंदाचा क्षण होता. म्हणूनच, आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा निरोप घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे लामला वाटते आहे.

Leave a Comment