
सांगली – सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित घोरपडे यांनी घेतला आहे. भाजपने तासगाव-कवठे महाकाळ मतदारसंघातून आर.आर.पाटील यांच्या विरोधात घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आर.आर.पाटील विरुद्ध अजित घोरपडे अशी झुंज येत्या विधानसभा निवडणुकीत रंगणार आहे.
भाजपमध्ये राष्ट्रवादीचे अजित घोरपडे
भाजपचे संजयकाका पाटील यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित घोरपडे यांनी उघड प्रचार केला होता. त्यामुळे तासगाव-कवठे महाकाळ या मतदारसंघातून भाजपच्या संजयकाका पाटील यांना ३८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. अजित घोरपडे यांची उमेदवारी ही आर.आर.पाटील आणि पर्यायाने राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणार आहे हे नक्की.
