
दमिश्क – पुर्व सिरियातील एका मोठय़ा तेलप्रकल्पावर आयएसआएस या इस्लामी दहशतवादी संघटनेने ताबा मिळविला आहे.
आयएसआयएसचा सिरियातील तेल प्रकल्पावर ताबा
पुर्व सिरियातील देअर अल जोउर प्रांतातल्या उमर तेल प्रकल्पावर आयएसआएसने गुरूवारी ताबा मिळविला. अल कायदाशी संबंधीत दहशतवादी संघटना नुसरा प्रंटने दोनच दिवसांपुर्वी या तेल प्रकल्पावरील ताबा सोडला होता. आता आयएसआएसच्या ताब्यात सिरियातील हा महत्वाचा तेल प्रकल्प आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आयएसआएस या दहशतवादी संघटनेची ताकद वाढत असून, सिरिया आणि इराकला आयएसआएसला रोखण्यात अपयश येत आहे.
