एकीकडे ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांचा सामना खेळत आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (बीबीएल) देखील सुरू झाली आहे. 15 डिसेंबरपासून बिग बॅश लीगचा 14 वा हंगाम सुरू झाला आहे. या मोसमातील सातवा सामना मेलबर्न स्टार्स आणि ॲडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळला जात आहे, या संघाचा कर्णधार मार्कस स्टोइनिस आहे. या सामन्यात मेलबर्नचा फलंदाज बेन डकेटने असा झेल घेतला की तो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा 2024 मधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल आहे. डकेटने हवेत उडी मारून एका हाताने चेंडू पकडला आणि विरोधी फलंदाजाचे काम तमाम केले.
Video : 2024 चा सर्वोत्तम झेल! पापणी लवताच झाले फलंदाजाचे काम तमाम
ॲडलेड स्ट्रायकर्सकडून फलंदाजी करताना इंग्लंडचा स्टार क्रिकेटर बेन डकेटने शानदार झेल घेतला. मेलबर्न स्टार्सकडून खेळताना त्याने पीटर सिडलच्या चेंडूवर हवेत उडी मारली आणि धोकादायक ठरत असलेल्या डी’आर्सी शॉर्टचा डाव संपुष्टात आणला. डी’आर्सी शॉर्टने 41 चेंडूत 60 धावा केल्या होत्या. तेवढ्यात त्याने पीटर सिडलचा चेंडू डकेटच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न केला.
आर्सीचा शॉट डकेटच्या डोक्यावरून वेगाने जात होता. तेवढ्यात बेन डकेटने हवेत उडी मारली. त्याने हा झेल फक्त एका हाताने पूर्ण केला. समालोचकही डकेटच्या या उत्कृष्ट झेलचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. डकेटच्या शानदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो बीबीएलने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. तसेच लिहिले, ‘बीबीएलमध्ये तुम्ही पाहिलेला सर्वोत्तम झेलांपैकी एक. बेन डकेटने पदार्पणातच धडाकेबाज खेळ केला.
बेन डकेटने या सामन्याद्वारे मेलबर्न स्टार्सकडून बीबीएलमध्ये पदार्पण केले आहे. याआधी तो बीबीएलमध्ये 12 सामने खेळला होता. सध्याच्या BBL चॅम्पियन ब्रिस्बेन हीटसाठी (BH) त्याने 12 सामन्यांत 302 धावा केल्या आहेत. बेनने 3 अर्धशतके झळकावली असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 78 आहे.