क्रिकेटच्या मैदानावर अनेकवेळा अशी आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळतात की क्षणभरही विश्वास बसणे कठीण होते. कधी एखादा फलंदाज गगनचुंबी षटकार मारून चाहत्यांना चकित करतो, तर कधी क्षेत्ररक्षक हवेत उडी मारून आश्चर्यकारक झेल घेतो. पण आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यानंतर तुम्ही म्हणाल की जर तुम्ही भाग्यवान असाल, तर तुम्ही या फलंदाजासारखे होऊ शकता, जो बोल्ड होऊनही आऊट झाला नाही. यानंतर त्याने शतक झळकावले.
Video : फलंदाज झाला बोल्ड, पण तरीही ठोकले शतक, क्वचितच पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये अशी दृश्ये
बिग क्रिकेट लीग (BCL) 2024 च्या सामन्यादरम्यान एक विलक्षण दृश्य दिसले, जेव्हा एक फलंदाज बोल्ड होऊनही नाबाद होता. कारण बेल्स स्टंपवरून खाली पडल्या नव्हत्या. बीसीएलमध्ये एमपी टायगर्स आणि यूपी ब्रिज स्टार्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये एमपी टायगर्सच्या गोलंदाजीदरम्यान ही मजेशीर घटना घडली. फॅनकोडने त्याच्या X हँडलवरून त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
The bail that just wouldn't bail on you 😅
Do you think this should be given OUT? 🤔👇#BCLT20onFanCode pic.twitter.com/nZePaA7gqb
— FanCode (@FanCode) December 17, 2024
पवन नेगी जेव्हा यूपी ब्रिज स्टार्सचा कर्णधार चिराग गांधीकडे गोलंदाजी करत होता, तेव्हा चिराग 98 धावांवर खेळत होता. त्याने दोन चेंडूत 10 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर चिराग बोल्ड झाला. चेंडू स्टंपला लागला. पण एकही बेल्स खाली पडली नाही. चिराग बाद होण्यापासून वाचला आणि त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने आपले शतक पूर्ण केले.
बीसीएलच्या या सामन्यात एमपी टायगर्स संघाने प्रथम फलंदाजी करत शानदार खेळ केला. संघाने 120 चेंडूत 239 धावा ठोकल्या. पवन नेगीने झंझावाती खेळी करत अवघ्या 38 चेंडूत 87 धावा केल्या. तर साकेत शर्माने 52 चेंडूत शतक झळकावले. प्रत्युत्तरादाखल यूपी ब्रिज स्टार्स संघ संघर्ष करताना दिसला. कर्णधार चिराग गांधीच्या 58 चेंडूत 101 धावा केल्याशिवाय अन्य कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. UB Bridge Stars ने 20 षटकात 5 गडी गमावून फक्त 168 धावा केल्या. परिणामी 71 धावांच्या फरकाने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.