Pushpa 2 : आता पुष्पा राज खाणार बिहारी लिट्टी-चोखा, नोंद करुन ठेवा अल्लू अर्जुनला भेटण्याची वेळ आणि पत्ता!


पुष्पा 2 ची रिलीज डेट 5 डिसेंबर आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप लाँच झालेला नाही. हा 17 नोव्हेंबर रोजी भव्य स्तरावर लॉन्च होणार असल्याची माहिती आहे.

हा साऊथचा चित्रपट असल्याने त्याचा ट्रेलर हैदराबादमध्ये लाँच व्हायला हवा होता. कदाचित हैदराबादमध्ये महिनाभराच्या कर्फ्यूमुळे तो लॉन्च केला जाणार नाही. हा कर्फ्यू नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपणार आहे. आता निर्मात्यांना मुंबईत ट्रेलर लॉन्च करता आला असता, पण त्यांनी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला. ‘पुष्पा 2’चा ट्रेलर पटना, बिहारमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
https://x.com/PushpaMovie/status/1856354802256753130?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1856354802256753130%7Ctwgr%5E1a563a8965db43592698046ae2814615c2c5d10b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fsouth-cinema%2Fpushpa-2-trailer-will-be-launched-in-patna-bihar-gandhi-maidan-allu-arjun-2940926.html
खरं तर, ‘पुष्पा 2’ची दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात जास्त चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पिक्चर केवळ हिंदी पट्ट्यातून 500 कोटींहून अधिक कमाई करेल. निर्मात्यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी संपूर्ण लक्ष उत्तर भारतावर ठेवले आहे. येथून ते त्यांच्या प्रचाराची सुरुवात करत आहेत. कारण संख्येच्या बाबतीतही हिंदी पट्टा दक्षिणेपेक्षा जास्त आहे. म्हणूनच अधिकाधिक हिंदी भाषिक लोकांनी त्यांचा चित्रपट पाहावा, जेणेकरून चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळावा, अशी निर्मात्यांची इच्छा आहे.

‘पुष्पा’ च्या अधिकृत अकाऊंटवरून अशी माहिती देण्यात आली आहे की ‘पुष्पा 2’ चा ट्रेलर 17 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. त्यासाठी टीम पाटण्याला जाणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पाटणा येथील गांधी मैदानावर संध्याकाळी 5 वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनही तेथे पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणूनच निर्मात्यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे – पटनावासी, तुम्ही तयार आहात का पुष्पा राजचे स्वागत करण्यास ?

आता पटना येथे ट्रेलर लाँच झाल्याचा अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला किती फायदा होतो आणि हा चित्रपट उत्तर भारतातील प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षिक करु शकतो की नाही? ते बघूया.