Box Office Day 2 : भूल भुलैया 3 ने केली ओपनिंगपेक्षा जास्त कमाई, चित्रपटाने दोन दिवसांत केले जबरदस्त कलेक्शन


बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूह बाबा बनून परतला आहे. यावेळी विद्या बालननेही मंजुलिका म्हणून पुनरागमन केले आहे. तर माधुरी दीक्षितची नवीन एंट्री भूल भुलैया 3 मध्ये दिसली आहे. रिलीजपूर्वीच सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा रंगली होती. सिंघम अगेनच्या तुलनेत भूल भुलैया 3 ची आगाऊ बुकिंग जास्त होती. मात्र, कमाईच्या बाबतीत सिंघम अगेनने पहिल्याच दिवशी आगेकूच केली. पण दुसऱ्या दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झाली असली, तरी भूल भुलैया 3 चे आकडे पहिल्या दिवसाच्या तुलनेत जास्त आहेत.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक माहितीनुसार, भूल भुलैया 3 ने पहिल्या दिवशी 35.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा 36.50 कोटी होता, जो पूर्वीपेक्षा एक कोटी अधिक आहे. या दोन दिवसांच्या कमाईने कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने आतापर्यंत 72 कोटींची कमाई केली आहे.

जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने जगभरात 55.5 कोटींची कमाई केली. दुस-या दिवशी कलेक्शन 50 कोटींहून अधिकने 100 कोटी रुपये पार केले. तर चित्रपटाचे बजेट जवळपास 150 कोटी रुपये आहे. यामुळे पहिल्या वीकेंडलाच चित्रपट बजेट वसूल करणार आहे.

भूल भुलैया 3 बद्दल बोलायचे तर हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, जो १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात तृप्ती डिमरी, कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, विजय राज, राजपाल यादव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर चित्रपटाचे लेखन आकाश कौशिक यांनी केले आहे.