The RajaSaab : प्रभासच्या आगामी ‘द राजासाब’ चित्रपटाबाबत येत आहे मोठी बातमी


साऊथचा सुपरस्टार प्रभास ‘कल्की 2898 एडी’ नंतर ‘द राजासाब’मध्ये दिसणार आहे, याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 23 ऑक्टोबरला या चित्रपटात काही खास अपडेट येऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. खरंतर, त्या दिवशी प्रभास त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे.

प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ‘द राजासाब’चे निर्माते चित्रपटासाठी खास योजना आखत आहेत. असे सांगितले जात आहे की 23 ऑक्टोबरला ॲडव्हान्स बर्थडे पोस्टर रिलीज होऊ शकते. मात्र, आता काय होणार, हे 21 ऑक्टोबरला दुपारी 4.05 वाजेपर्यंत अधिकृत घोषणेद्वारे कळेल. मारुतीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा हॉरर चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
https://x.com/rajasaabmovie/status/1848252161966448833?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1848252161966448833%7Ctwgr%5E2e7c4eb612b7f9494a1fbae6498b8f89ff4ffed9%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fsouth-cinema%2Fprabhas-the-raja-saab-massive-update-special-advance-birthday-poster-expected-sanjay-dutt-2900281.html
‘द राजासाब’च्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये मी तयार आहे, तुम्ही देखील तयार आहात ना, हा चित्रपट पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली बनवला जात आहे. या चित्रपटात संजय दत्तचाही समावेश आहे, जो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार या तीन अभिनेत्रींच्या नावाचाही या चित्रपटात समावेश आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, ‘द राजा साब’चे बजेट 400 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात 1980 चे एक सुपरहिट गाणे देखील असू शकते, ज्यावर प्रभास या तिन्ही अभिनेत्रींसोबत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी ‘कल्की 2898 एडी’मध्ये प्रभास दिसला होता, या चित्रपटाने बंपर कमाई केली होती, आता ‘द राजा साब’कडूनही अशाच अपेक्षा आहेत.