
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि थ्रेडची मूळ कंपनी मेटाने आपल्या 24 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यामागे ‘मेटा’ने अतिशय विचित्र कारण दिले आहे.
फेसबुक कर्मचाऱ्यांनी असे काय केले? ज्यामुळे झुकेरबर्गला त्यांना दाखवावा लागला बाहेरचा रस्ता
वास्तविक, मेटा आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत अन्न खाण्यासाठी फूड व्हाउचर देते. ज्यामध्ये हाकलून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी फूड व्हाउचर चुकीच्या ठिकाणी वापरल्याचा आरोप मेटाने केला आहे.
Meta आपल्या कर्मचाऱ्यांना दुपारच्या जेवणासाठी $25 व्हाउचर, $20 नाश्त्यासाठी आणि $25 रात्रीच्या जेवणासाठी देते. ज्याचा वापर काही कर्मचाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी केला आहे. त्यामुळे मेटाने आपल्या 24 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.
मिळालेल्या माहितीनुसार, मेटा कर्मचाऱ्यांनी कंपनीने दिलेल्या फूड व्हाउचरसह टूथपेस्ट, वॉशिंग पावडर, मुरुमांचे पॅड आणि घरगुती वस्तू खरेदी केल्यामुळे त्यांची नोकरी गेली आहे. अहवालानुसार, अधूनमधून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना फटकारले होते, मात्र ज्या कर्मचाऱ्यांना इशारे देऊनही त्याचे पालन केले नाही, त्यांना मेटातर्फे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मेटाने कामावरून काढून टाकलेल्या काही कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, त्यांना मेटाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी हे फूड व्हाउचर वापरणे बंद केल्याचे सांगितले, तरीही मेटाने त्यांच्यावर कारवाई केली.
