मुलतान कसोटीत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडाला की काय असे वाटत होते. आधी जो रूट आणि आता हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची गंभीर दखल घेतली. हॅरी ब्रूकने तर पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने अवघ्या 310 चेंडूत त्रिशतक झळकावले. कोणत्याही इंग्लिश फलंदाजाचे हे सर्वात जलद त्रिशतक आहे आणि 34 वर्षांनंतर इंग्लिश फलंदाजाने त्रिशतक झळकावले आहे. हॅरी ब्रूकच्या आधी एका इंग्लिश फलंदाजाने 1990 मध्ये त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर ग्रॅहम गूचने भारताविरुद्ध 333 धावांची इनिंग खेळली होती. आता ब्रूकने 34 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
Harry Brook triple-century : हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध ठोकले त्रिशतक, मोडला सेहवागचा विक्रम
हॅरी ब्रूकने अवघ्या 310 चेंडूत त्रिशतक झळकावले आणि आता तो मुलतानचा नवा सुलतान बनला आहे. कारण हॅरी ब्रूक मुलतानच्या मैदानावर सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. याआधी सेहवागने या मैदानावर 364 चेंडूत त्रिशतक झळकावले होते. ब्रूकने मुलतानमधील सेहवागच्या सर्वात मोठ्या खेळीचा विक्रमही मोडला. सेहवागने मुलतानमध्ये 309 धावा केल्या होत्या आणि या मैदानावर ब्रूकने 317 धावांची इनिंग खेळली. कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान तिहेरी शतकाबाबत बोलायचे झाल्यास, सेहवागनंतर हॅरी ब्रूकचा क्रमांक लागतो. सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 278 चेंडूत त्रिशतक झळकावले होते.
Harry Brook completes a remarkable Test triple century 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/aOdRwGfBWg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 10, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा हॅरी ब्रूक हा केवळ सहावा इंग्लिश खेळाडू आहे. आता ब्रूकचे नाव लेन हॉटन, वॅली हॅमंड, ग्रॅहम गूच, अँडी सँडहॅम, जॉन एडरिक यांसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाले आहे. तर, पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे.
हॅरी ब्रूकने किती वेगाने पूर्ण केले तिहेरी शतक ?
- हॅरी ब्रूकने मुलतान कसोटीत अवघ्या 49 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
- या खेळाडूने 118 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
- ब्रुकने 186 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या.
- ब्रूकने द्विशतक झळकावण्यासाठी 245 चेंडू खेळले.
- ब्रूकने 281 चेंडूत 250 धावा पूर्ण केल्या.
- यानंतर ब्रुकने 310 चेंडूत 300 धावांचा आकडा गाठला.