
टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक आणि कर्णधार रोहित शर्माचा खास मित्र अभिषेक नायरने 8 ऑक्टोबर रोजी आपला 41 वा वाढदिवस साजरा केला. बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळणाऱ्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी हा खास दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यासोबत मस्ती करताना दिसले. अनेक देशांतर्गत क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव केला. यावेळी रिंकू सिंग आणि हर्षित राणा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसले. हर्षितने तर अभिषेक नायरला दुधाने आंघोळ घातली. रिंकूने एक फोटो पोस्ट करत टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची टेर ही खेचली. अभिषेक नायरने हे सोशल मीडियावर शेअर केले आहे.
टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला घालण्यात आली दुधाने आंघोळ, कारण आहे खूप खास
अभिषेक नायरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती. मात्र, त्याची कारकीर्द टीम इंडियासाठी तितकीशी चांगली नव्हती. पण त्याने कोचिंगमध्ये जबरदस्त काम केले, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत क्रिकेटपटू असोत किंवा टीम इंडियासाठी खेळणारे खेळाडू असोत, प्रत्येकजण त्याच्यावर खूप प्रेम करतो. हे प्रेम त्याच्या वाढदिवशीही पाहायला मिळाले. अनेक तरुण देशांतर्गत क्रिकेटपटूंनी त्याच्या वाढदिवशी त्याला प्रेमाने भैया म्हणत शुभेच्छा दिल्या.
नायरने स्थानिक स्तरावर खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे खूप चांगले काम केले आहे. अनेक खेळाडू त्याचे कौतुक करतात. आयपीएलमध्ये प्रशिक्षक होण्यापूर्वी अभिषेक नायरने मार्गदर्शक म्हणून काम केले आणि देशातील अनेक खेळाडूंना यशाचा मार्ग दाखवला. याचा उल्लेख खुद्द टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला आहे.
रोहित शर्माने 2007 मध्येच वनडे आणि टी-20 मध्ये पदार्पण केले होते. 2007 मध्ये, तो टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा देखील एक भाग होता. तथापि, रोहित त्याच्या प्रतिभेनुसार सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला, परिणामी त्याला 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. याचे त्याला खूप वाईट वाटले. यानंतर अभिषेक नायरने रोहित शर्माला प्रशिक्षण दिले.
https://images.tv9hindi.com/wp-content/uploads/2024/10/abhishek-nayar-birthday-celebrated.mp4?_=4
खुद्द अभिषेक नायरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातून वगळल्यानंतर रोहित खूप निराश झाला होता, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याने रोहितच्या फिटनेसवर काम केले, कारण त्यावेळी त्याचे वजन जास्त होते. यावरून त्याला आपल्या ताकदीची जाणीव झाली आणि पुढे काय झाले, ते आज सर्वांसमोर आहे. अभिषेक नायरसाठी हे मोठ्या यशापेक्षा कमी नव्हते. तो स्वतः या गोष्टीने खूप खूश होता, त्यानंतर त्याने मेंटॉर बनण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दोघे खूप चांगले मित्र आहेत.
अभिषेक नायर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त खेळू शकला नाही. त्याला टीम इंडियासाठी फक्त 3 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याला फक्त एका डावात फलंदाजीची संधी मिळाली. यातही तो केवळ 7 चेंडू खेळून एकही धाव न काढता नाबाद परतला. नायरला टीम इंडियासाठी टी-20 आणि कसोटी पदार्पण करता आले नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमधील त्याचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. अभिषेक नायरच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 103 सामन्यात 5749 धावा आणि 173 विकेट आहेत. तर लिस्ट ए च्या 99 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 2145 धावा आणि 79 विकेट आहेत. याशिवाय 95 टी-20 सामन्यांमध्ये नायरने 1291 धावा केल्या आहेत आणि 27 बळीही घेतले आहेत.
