सध्या एका मॉडेल चायवालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. हा व्हिडिओ अवघ्या चार दिवसांत 1 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ‘द हंग्री पंजाबी’ या फूड व्लॉगरने हा शेअर केला आहे. सिमरन गुप्ता असे या महिलेचे नाव आहे, ती उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असून ती सौंदर्य स्पर्धा विजेती देखील आहे. तिने मॉडेलिंगही केले आहे. पण कोविड-19 साथीच्या आजारानंतर, लॉकडाऊनमुळे जेव्हा तिच्या मॉडेलिंग करिअरवर परिणाम झाला, तेव्हा तिने लखनऊमध्ये स्वतःचे स्टार्टअप म्हणून चहाचे दुकान उघडले.
लखनऊची मॉडेल चायवालीच्या व्हिडिओने उडवून दिली खळबळ, तिची स्टाइल पाहून लोक म्हणाले- बिग बॉसची पुढची स्पर्धक
सिमरन ही छोट्या उद्योजकांच्या लांबलचक यादीपैकी एक आहे ज्यांनी चहा विक्रीला ट्रेंडी व्यवसायात रूपांतरित केले आहे. प्रफुल्ल बिलोरे उर्फ एमबीए चायवाला, नागपूरच्या डॉली चायवाला यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा या यादीत समावेश आहे.
2018 मध्ये मिस गोरखपूरचा किताब जिंकल्यानंतर सिमरनने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. एका हिंदी वेबसाइटशी बोलताना तिने सांगितले होते की मिस गोरखपूर झाल्यानंतर तिचे आयुष्य बदलले. मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर ती दिल्लीला गेली. तिथे तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केले.
तिने सांगितले की आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, पण नंतर अचानक कोविड आला आणि लॉकडाऊननंतर तिचे काम ठप्प झाले. तिला गोरखपूरला परतावे लागले. कुटुंबातील ती एकमेव कमावती सदस्य होती. यानंतर सिमरनने पैसे कमावण्यासाठी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. एमबीए चायवाला प्रफुल्ल बिल्लोर आणि पाटणाची पदवीधर चायवाला प्रियंका गुप्ता यांच्यापासून प्रेरित होऊन, तिने लखनौमध्ये चहाचे दुकान उघडले, जे अनेकदा सोशल मीडियावर दाखवले जात आहे. तिचे स्वतःचे इन्स्टा खाते देखील आहे, ज्याला 15 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.