
पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास तेलगू सिनेमातील मोस्ट अवेटेड ‘द राजा साब’ या चित्रपटातून रोमँटिक भूमिकेत पुनरागमन करत आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ‘द राजा साब’पूर्वी प्रभास ‘कल्की एडी 2898’मध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘द राजा साब’ हा एक हॉरर कॉमेडी आहे, ज्यामध्ये प्रभाससोबत मालविका मोहनन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या त्याच्या ‘द राजा साब’ या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
The Raja Saab : कधी पूर्ण होणार प्रभासच्या ‘द राजा साब’चे शूटिंग? समोर आली माहिती
‘द राजा साब’ हा मारुतीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला बिग बजेट चित्रपट आहे. सध्या निर्मात्यांचे संपूर्ण लक्ष चित्रपटाचे शूटिंग वेळेत पूर्ण करण्यावर आहे. अलीकडेच चित्रपटाचे निर्माते टीजी विश्व प्रसाद यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखेबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘द राजा साब’चे शूटिंग नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. त्याच्या ‘स्वॅग’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने ही माहिती दिली.
‘द राजा साब’चे एकूण बजेट 400 कोटी रुपये असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. ‘द राजा साब’ 10 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे. आगामी काळात प्रभासचे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘द राजा साब’मध्ये मालविका मोहननसोबत निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट पीपल मीडिया फॅक्टरीच्या बॅनरखाली बनवला जात आहे. चित्रपटासंबंधीच्या अपडेटनुसार, या चित्रपटात 1980 सालचे एक सुपरहिट हिंदी गाणे समाविष्ट केले जाऊ शकते, ज्यामध्ये प्रभास तिन्ही अभिनेत्रींसोबत दिसणार आहे.
IMBD च्या रिपोर्टनुसार या चित्रपटात संजय दत्तचाही समावेश आहे. या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. प्रभासच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यातील नावांमध्ये ‘स्पिरिट’, ‘सालार 2’ आणि ‘कनप्पा’ यांचा समावेश आहे. ‘कनप्पा’मध्ये प्रभासचा कॅमिओ असणार आहे, तसेच संदीप रेड्डी वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘स्पिरिट’मध्ये प्रभास पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, ‘द राजा साब’ व्यतिरिक्त प्रभासच्या इतर कोणत्याही आगामी चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
