Box Office Collection : सुट्टी दिवशी फुल्ल पैसा वसूल ! ‘देवरा’ने सहाव्या दिवशी ठोकला षटकार


ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान स्टारर ‘देवरा – पार्ट 1’ त्याच्या कमाईमुळे चर्चेत आहे. प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाविषयी बरीच चर्चा झाली होती, 27 सप्टेंबरला ‘देवरा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच, तो पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘देवरा’ला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या चित्रपटाची कमाई हिंदी चित्रपटसृष्टीत काही विशेष करु शकेल, असे वाटत नाही.

ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपटाच्या रिलीजचा आज सातवा दिवस आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या सहाव्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. SACNILC च्या ताज्या अहवालानुसार, ‘देवरा’ ने पहिल्या बुधवारी बॉक्स ऑफिसवर 20.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी थोडे चढ-उतार असू शकतात. यासह हा चित्रपट आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई आता 6 दिवसांत 207.85 कोटींवर पोहोचली आहे.

जेव्हा ‘देवरा’ मोठ्या पडद्यावर आला, तेव्हा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 82 कोटींची अप्रतिम कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ओपनिंग डे कलेक्शन पाहिल्यानंतर शनिवारच्या सुट्टीत ‘देवरा’ नक्कीच मोठी कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण दुसऱ्याच दिवशी कमाई निम्मी झाली. यामुळे निर्मात्यांपासून स्टार्सपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला. चित्रपटाच्या उत्पन्नात घट दिसून येत आहे.

  • ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’चे आतापर्यंतचे कलेक्शन
  • पहिल्या दिवशी-82.5 कोटी
  • दुसऱ्या दिवशी-38.2 कोटी
  • तिसऱ्या दिवशी-39.9 कोटी
  • चौथ्या दिवशी-12.75 कोटी
  • पाचव्या दिवशी-14 कोटी
  • सहाव्या दिवशी-20.50 कोटी **
    आतापर्यंत एकूण-207.85 कोटी