Salman Khan : सलमान खानला तुरुंगात पाहून सलीम खान यांची झाली होती अशी अवस्था!


आपल्या चित्रपट आणि लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेचा भाग असणारा सलमान खान केवळ एक चांगला अभिनेताच नाही, तर खूप चांगला मुलगाही आहे. मुलगा होण्यापासून ते मोठा भाऊ होण्यापर्यंतचे प्रत्येक कर्तव्य त्याने अतिशय चोखपणे पार पाडले आहे आणि तो ते करतच आहे. सलमान खानबद्दल नेहमीच असे म्हटले जाते की तो त्याच्या आई-वडिलांचा खूप आदर करतो. वडील सलीम खान आल्यावर सलमान आपल्या जागेवरुन उठून उभा राहतो. सलमानचा वडिलांबद्दलचा आदर पाहून पाकिस्तानातील स्टार्सही त्याचे चाहते आहेत. पण भाईजानच्या आयुष्यात एक वाईट टप्पा आला, जेव्हा त्याचे वडील सलीम खान यांना जेवतानाही अपराधी वाटत होते.

वास्तविक, सलीम खान यांच्या एका मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलीम खान आपल्या मुलाच्या वाईट टप्प्याबद्दल बोलताना दिसत आहेत. सलीम खान म्हणतात, जेव्हा सलमानला 18 दिवस तुरुंगात टाकण्यात आले होते, तेव्हा मला घरी एसी चालवल्यावर अपराध्याची भावना वाटायची, जेवल्याबद्दल मला अपराधी वाटायचे… तुम्हाला समजले आणि मी तुरुंगात सलमानला भेटायला गेलो होतो, तेव्हा सलमान तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याने आईला हाक मारली आणि म्हणाला, मम्मी, बाबांना पुन्हा येथे आणू नकोस.

सलमान खान त्याच्या वडिलांना दुःखात पाहू शकत नाही. त्याच बरोबर सलीम खान सुद्धा आपल्या मोठ्या मुलावर खूप प्रेम करतात. सलीम यांना सलमानच्या लग्नाची कधीच चिंता वाटत नाही. दिग्गज लेखकाने सलमानच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींबद्दल म्हटले होते की, त्या सर्व आपले करिअर घडवण्यासाठी त्याच्याभोवती राहतात. सलीम खान यांच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, वडील आणि मुलामधील प्रेम आणि भावना शब्दांच्या पलीकडे आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, सलीम खान यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की सलमान खान इतका प्रसिद्ध होईल. आपल्या संस्कारांमुळे सलमान पाकिस्तानातील मोठ्या व्यक्तींमध्येही प्रसिद्ध आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर सलमान खानबद्दल म्हणाला होता की, व्यक्ती आपल्या आई-वडिलांसमोर नोकराप्रमाणे जगतो, हेच त्याच्या यशाचे सर्वात मोठे कारण आहे. तो त्याच्या पालकांचा खूप आदर करतो. भारतासोबतच पाकिस्तानातील लोकही सलमान खानवर खूप प्रेम करतात.