
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना कार्डिफ येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 3 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला झंझावाती सुरुवात करून दिली. तर जेक फ्रेझर मॅकगर्कने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. याशिवाय सलामीवीर मॅथ्यू शॉर्टनेही ऑस्ट्रेलियासाठी 5 विकेट घेत ऐतिहासिक विक्रम रचला. पण यापैकी काहीही ऑस्ट्रेलियासाठी कामी आले नाही. लियाम लिव्हिंगस्टन आणि जेकब बेथेल यांच्या 18 चौकारांनी हे सर्व झाकोळले आणि इंग्लंडने सामना सहज जिंकला.
इंग्लंडचे ते 18 चौकार पडले महाग, मॅथ्यू शॉर्टच्या या ऐतिहासिक विक्रमानंतरही ऑस्ट्रेलियाचा पराभव
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान ट्रॅव्हिस हेडने 14 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. बराच वेळ फ्लॉप ठरलेल्या जेक फ्रेजर मॅकगर्कने 31 चेंडूत 50 धावा केल्या. तर जोस इंग्लिसने 26 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण लियाम लिव्हिंगस्टन आणि जेकब बेथेलच्या झंझावातासमोर त्यांचा सर्व डाव व्यर्थ गेला. पाठलाग करताना लिव्हिंग्स्टनने 185 च्या स्ट्राईक रेटने 47 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले.
https://x.com/englandcricket/status/1834690003286286812?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1834690003286286812%7Ctwgr%5E9517d2cffd95404be7dc628557d3b846c8fae101%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fengland-beat-australia-in-2nd-t20-mathew-short-first-opening-batter-to-take-a-five-for-in-t20i-liam-livingstone-2830389.html
लिव्हिंग्स्टन व्यतिरिक्त, जेकब बेथेलने आपला फक्त दुसरा सामना खेळताना 183 च्या स्ट्राइक रेटने 24 चेंडूत 44 धावांची जलद खेळी खेळली. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. अशाप्रकारे दोन्ही फलंदाजांनी मिळून 18 चौकार लगावले आणि याच्या मदतीने त्यांनी 88 धावा करून सामना एकतर्फी केला. परिणाम असा झाला की इंग्लंडने फक्त 1 षटक शिल्लक असताना सामना जिंकला. लिव्हिंगस्टननेही बॉलने चमत्कार केला. त्याने 3 षटकात केवळ 16 धावा देत 2 बळी घेतले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
कार्डिफमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात मॅथ्यू शॉर्टने ऑस्ट्रेलियासाठी ऐतिहासिक विक्रम केला. तो आपल्या देशासाठी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 बळी घेणारा ICC पूर्ण सदस्य राष्ट्र संघातील पहिला सलामीवीर ठरला. या सामन्यात त्याने 24 चेंडूत 28 धावा केल्या. तसेच त्याने 3 षटकात 22 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. मात्र, बाकीच्या गोलंदाजांनी त्याला साथ दिली नाही, त्यामुळे या जबरदस्त स्पेलचा ऑस्ट्रेलियाला काहीच उपयोग झाला नाही.
