रोहित शर्माने बांगलादेश कसोटी मालिकेआधीच केली कमाल, वयाच्या 37 व्या वर्षीही हिटमॅनचा जलवा कायम


टीम इंडियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा भलेही 37 वर्षांचा झाला असेल, पण त्याचा करिष्मा अजूनही कायम आहे. नुकताच टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकून देणारा रोहित आता आयसीसी क्रमवारीत अव्वल आहे.

आयसीसीने बुधवारी नवीन क्रमवारी जाहीर केली ज्यामध्ये रोहित शर्मा कसोटीत पाचव्या तर वनडेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे, जो एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही क्रमवारीत पहिल्या 5 मध्ये आहे. आता रोहितला 8 दिवसांनंतर पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे, जिथे तो बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे.

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका रोहित शर्मासाठी सोपी, नसेल कारण या संघाविरुद्धचा त्याचा कसोटी रेकॉर्ड खूपच खराब आहे. रोहितने 3 कसोटीत केवळ 33 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा पाच वर्षांनंतर बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी ईडन गार्डन्सवर खेळली होती, ज्यात तो फक्त 6 धावा करून बाद झाला होता.