Reliance Jio 448 Plan : मुकेश अंबानींनी युजर्सना केले ‘खुश’, केला 13 OTT ॲप्ससह नवीन प्लॅन लॉन्च


प्रीपेड प्लॅन महाग केल्यानंतर आता टेलिकॉम कंपन्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी कमी किमतीत मोठ्या फायद्यांसह नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत आहेत. रिलायन्स जिओने आता वापरकर्त्यांसाठी 448 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे, टॅरिफ वाढीनंतर कंपनीकडे असा एकच प्लॅन होता, जो वापरकर्त्यांना 175 रुपयांमध्ये JioTV प्रीमियमचा मोफत प्रवेश देत होता.

आता Jio 448 प्लॅनसह, कंपनी वापरकर्त्यांना फक्त एक नव्हे तर 13 वेगवेगळ्या OTT ॲप्सवर मोफत प्रवेश देईल. या नवीन Jio प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज किती डेटा मिळेल आणि कोणते OTT ॲप्स दिले जातील ते आम्ही तुम्हाला सांगतो.

448 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातील. इतर फायद्यांबद्दल सांगायचे, झाले तर Jio TV Premium व्यतिरिक्त, हा प्लॅन ZEE5, SonyLIV, Discovery Plus, Lionsgate Play, Kanchha Lanka, SunNXT, Hoichoi, Planet Marathi, FanCode आणि Chaupal सारख्या OTT ॲप्सचा लाभ देईल.

दररोज 2 GB हाय स्पीड डेटासह रिलायन्स जिओची ही योजना तुम्हाला खरोखर अमर्यादित 5G अनुभव देईल. हा प्लान तुम्हाला महाग वाटू शकतो, परंतु या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या OTT ॲप्सची किंमत या प्लॅनपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला फक्त JioCinema प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल, तर या प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत 29 रुपये आहे.

448 रुपयांच्या या Reliance Jio प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जाईल, दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा या प्लॅनमध्ये एकूण 56 GB हाय-स्पीड डेटा मिळेल. रिलायन्स जिओकडे अशा अनेक योजना आहेत, ज्या नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह येतात.

जर तुम्हाला नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 1299 रुपये किंवा 1799 रुपयांचा प्लान खरेदी करावा लागेल. हे दोन्ही प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतात.