VIDEO VIRAL: विदेशी महिलेची पाकिस्तान्याने उडवली खिल्ली, नवऱ्याला सांगितले – ती तुझ्या लायक नाही


पाकिस्तानला भेट देणाऱ्या एका ब्रिटीश जोडप्याला रेल्वेत प्रवास करताना तिकीट कलेक्टरने या जोडप्याच्या पत्नीला ‘लठ्ठ’ म्हणत अपमानित केल्याने लाजीरवाणी परिस्थितीला सामोरे जावे लागले. निर्लज्ज टीसी अश्लील शेरेबाजी करताना कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्रिटीश पर्यटकाने रेल्वेच्या डब्यात उपस्थित तिकीट कलेक्टरशी आपल्या पत्नीची ओळख करून दिली, तेव्हा ही लज्जास्पद घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टीसी अत्यंत निर्लज्जपणे त्या व्यक्तीला त्याच्या तोंडवर सांगतो की त्याची पत्नी त्याच्या लायक नाही. यावर पर्यटक रागाने विचारतो, तुला काय म्हणायचे आहे? मग TC म्हणतो – ती तुमच्यापेक्षा कमी निरोगी आहे… म्हणजे ‘लठ्ठ’. ब्रिटीश पर्यटकाला टीसीच्या विधानाचे इतके वाईट वाटले की त्याने लगेच सांगितले की पश्तूनांसाठी हे चांगले आदरातिथ्य नाही.


व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, ब्रिटीश प्रवासी आणि टीसी यांच्यात पत्नीसोबत गैरवर्तन केल्याने जोरदार वादावादी झाली. यानंतर पर्यटक म्हणतो, ‘तुम्ही असे म्हणू शकत नाही. हे बरोबर नाही.’ ज्यावर टीसी सामान्य संभाषण म्हणत, ते टाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु पर्यटक त्याला सांगतो की हे असभ्य आहे.

यानंतर टीसी म्हणाला, तुम्ही आमचे पाहुणे आहात, कृपया वाईट वाटून घेऊ नका. मग पर्यटक आपल्या बायकोकडे बोट दाखवून म्हणतो, ती तुमची पाहुणी नाही का? यावेळी महिला निराश भावनेने मोबाईलकडे पाहत राहते. पर्यटक मग टीसीला सांगतो, तुम्ही त्या महिलेबद्दल जे काही बोललात, ते तुम्ही म्हणू शकत नाही. देशातील पर्यटकांचा आदर करायला शिकले पाहिजे.

तथापि, टीसीने नंतर सांगितले की त्याचा उद्देश तिला त्रास देण्याचा नव्हता. मात्र या घटनेने पाकिस्तानातील लोकांची मानसिकता उघड झाली आहे. याआधी इस्लामाबादमधून स्वातंत्र्यदिनी एका जमावाने एका मुलीची छेड काढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते.