VIDEO ; सासू असावी अशी ! जावयासाठी बनवले एवढे पदार्थ ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही


आपल्या देशात कोणत्याही घरात जावयाची सगळ्यात जास्त उठबस केली जाते. कारण, जावई आनंदी असेल, तर आपली मुलगीही आनंदी असते. यामुळेच सासू जावयाचे स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. सध्या आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एक सासू आजकाल सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे, ज्यांनी आपल्या जावयाला आल्यावर त्याच्यासाठी इतके पदार्थ बनवले की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्नानंतर आषाढच्या पहिल्या महिन्यात पत्नीच्या माहेरी गेलेल्या एका व्यक्तीचे डझनभर स्वादिष्ट पदार्थांनी स्वागत करण्यात आले. चकली ते म्हैसूर पाकपर्यंत विवाहित जोडप्याला 100 वेगवेगळ्या पदार्थांसमोर बसवण्यात आले. आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका गावात झालेल्या या आदरातिथ्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये एका विवाहित जोडप्याला डिश सर्व्ह करताना दाखवण्यात आले आहे.


रत्ना कुमारी आणि रवी तेजा असे या जोडप्याचे नाव आहे, ज्यांचे 2023 मध्ये लग्न झाले होते. रवी आणि त्याच्या पत्नीने या वर्षी त्यांचा पहिला आषाढ महिना एकत्र पूर्ण केला, जिथे पारंपारिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.


अशाच आणखी एका प्रकरणात, तेलुगू भाषिक राज्यातील एका कुटुंबाने त्यांच्या जावयाला 100 नव्हे, तर 379 प्रकारचे पदार्थ वाढले. 2023 मध्ये मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळी ही घटना समोर आली होती आणि एलुरु जिल्ह्यातील भीमा राव आणि चंद्रलीला नावाच्या जोडप्याने या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला. डिशेसमध्ये भात, करी, तळलेले पदार्थ, मिठाई आणि अगदी शीतपेयांची यादी होती. वृत्तानुसार, राव आणि त्यांच्या पत्नीला 40 प्रकारचे फ्लेवर्ड भात, 20 चटणीसह रोट्या, 40 करी, 40 फ्राय, 90 ते 100 मिठाई, 70 गरम पदार्थ, ज्यूस, पेये आणि बरेच काही वाढण्यात आले.