साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट ‘पुष्पा 2’ची चर्चा जोरात सुरू आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहे. ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. केवळ दक्षिणेतच नाही, तर हिंदीतही ‘पुष्पा’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. अल्लू अर्जुनला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
या देशात शूट होणार पुष्पा 2 चा हा खास सीक्वेन्स, वेळेवर पूर्ण होणार का अल्लू अर्जुनचा चित्रपट?
अलीकडेच, निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित एक क्लिप शेअर केली होती, ज्याद्वारे त्यांनी माहिती दिली होती की ते सध्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग करत आहेत. ‘पुष्पा 2’ अधिकृत X खात्यावरून असे ट्विट करण्यात आले आहे की, “शुट अपडेट, ‘पुष्पा 2 द रुल’ च्या क्लायमॅक्ससाठी एक नेत्रदीपक ॲक्शन एपिसोड शूट केला जात आहे. ‘पुष्पा 2 द रुल’ 6 डिसेंबर 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होईल. आता ETimes च्या ताज्या अहवालावर विश्वास ठेवला, तर चित्रपटाचा पुढील विशेष सीक्वेन्स श्रीलंकेत शूट केला जाणार आहे.
Shoot Update :#Pushpa2TheRule is currently shooting a spectacular action episode for the climax🔥🔥#Pushpa2TheRule Grand release worldwide on 6th DEC 2024.
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku #FahadhFaasil @ThisIsDSP @SukumarWritings @MythriOfficial @TSeries pic.twitter.com/X5haaasHAj
— Pushpa (@PushpaMovie) August 5, 2024
सप्टेंबरपासून चित्रपटाची टीम श्रीलंकेत शूटिंग सुरू करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट श्रीलंकेच्या जंगलात शूट केला जाईल, ज्यामध्ये अल्लूसह त्याच्या टोळीतील सदस्य आणि इतर पात्रांसह अनेक दृश्ये आणि काही ॲक्शन सीन देखील तेथे शूट केले जातील. चित्रपटाचा दुसरा भाग पहिल्यापेक्षा मोठा आणि चांगला करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. निर्मात्यांना कोणत्याही परिस्थितीत पुष्पा 2 पुष्पा 1 समोर फिकट दिसावे असे वाटत नाही.
पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनचे पात्र पुष्पराज आजूबाजूच्या देशांमध्ये स्मगलिंगचा व्यवसाय वाढवताना दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर बातमी आली की चित्रपटाच्या अनेक महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण बाकी आहे, त्यामुळे पुष्पा 2 ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र चित्रपटाच्या शूटिंगचे काम बाकी असल्याने अल्लू अर्जुनचा चित्रपट वेळेवर प्रदर्शित होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.