World Lungs Cancer day : धूम्रपान न करणारे देखील का पडत आहेत फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी, जाणून घ्या तज्ज्ञांकडून


कर्करोग हा जगासाठी मोठा धोका बनत आहे. दरवर्षी या आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. यापैकी फुफ्फुसचा कर्करोग हा अत्यंत धोकादायक मानला जातो. या कॅन्सरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. गेल्या वर्षी द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने एक अहवाल दिला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, धुम्रपान न करणारेही मोठ्या संख्येने फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बळी पडत आहेत. त्यांच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही आहेत. काही प्रकरणांमध्ये हा कर्करोग लहान मुलांमध्येही दिसून येत आहे, पण धूम्रपान न केल्यावरही हा कर्करोग का होतो? याबाबत तज्ज्ञांनी सांगितले आहे.

धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे धूम्रपान न करणारे देखील या कर्करोगाला बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रदूषणाचे लहान कण श्वासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात आणि नंतर कर्करोग होऊ शकतात. अनेक प्रकरणांमध्ये सेकंड हँड स्मोकिंगमुळेही कर्करोग होतो. याचा अर्थ असा की तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा धुम्रपान करणाऱ्यांचा धूर तुमच्या फुफ्फुसातही जातो आणि नंतर तो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो.

एखाद्या व्यक्तीच्या हार्मोनल मेकअपमुळे देखील फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. लॅन्सेटच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, धूम्रपान न करणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत धूम्रपान न करणाऱ्यांचीही कॅन्सरची चाचणी होणे गरजेचे आहे. कर्करोगाचा शोध घेण्यासाठी छातीची कमी डोसची LDCT चाचणी केली जाते. त्याचा कर्करोग ओळखता येतो.

लक्षणे काय आहेत

  • सतत छातीत दुखणे
  • खोकला
  • श्लेष्मा मध्ये रक्त
  • श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह
  • वारंवार छातीत संक्रमण

फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी रुग्णावर थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय रुग्णावर केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि टार्गेट थेरपीद्वारे उपचार केले जातात. काही प्रकरणांमध्ये इम्युनोथेरपी देखील दिली जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही