आणखी एका भारतीय नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवला आहे. नेमबाज स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नील कुसळेचा हा विजय ऐतिहासिक आहे, कारण या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. कोल्हापूरच्या या 29 वर्षीय नेमबाजाचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. या खेळाडूने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. हा खेळाडू 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करत होता आणि पॅरिसमध्ये त्याला संधी मिळाल्यावर त्याने इतिहास रचला.
स्वप्नील कुसळेने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे तिसरे पदक
🇮🇳🔥 𝗜𝗻𝗱𝗶𝗮'𝘀 𝗲𝗹𝗶𝘁𝗲 𝘀𝗵𝗼𝗼𝘁𝗲𝗿𝘀! A historic achievement for Swapnil Kusale as he wins India's first-ever medal in the 50m Rifle 3 Positions shooting event at the Olympics.
🧐 Here's a look at India's shooting medallists in the Olympics over the years.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024
स्वप्निल कुसळेने 451.4 गुणांसह कांस्यपदक पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नेमबाजाला हरवून त्याने कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा केवळ 7वा नेमबाज आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन नेमबाजांनी भारतासाठी पदके जिंकली आहेत. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले, त्याच्यासह सरबजोतनेही पदक जिंकले. आता स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे.
Exceptional performance by Swapnil Kusale! Congrats to him for winning the Bronze medal in the Men's 50m Rifle 3 Positions at the #ParisOlympics2024.
His performance is special because he’s shown great resilience and skills. He is also the first Indian athlete to win a medal in… pic.twitter.com/9zvCQBr29y
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2024
ऑलिम्पिक सुवर्णपदकापूर्वी स्वप्नील कुसाळेने कैरो येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 2021 मध्ये दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियाई रायफल-पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या खेळाडूने 2017 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे नेमबाज
- 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन सिंग राठोड यांनी नेमबाजीत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. त्यांनी रौप्य पदक जिंकले होते.
- 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकले होते.
- लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये विजय कुमारने रौप्य आणि गगन नारंगने कांस्यपदक जिंकले होते.
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने 2, मनू भाकरसह सरबज्योत सिंगने कांस्यपदक जिंकले. आता या यादीत स्वप्निलचेही नाव जोडले गेले आहे.