
पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक मोहिमेतील योगदानाबद्दल भारतीय दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्राला ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. 10 ऑगस्ट रोजी समारोप समारंभाच्या आधी त्याला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय आहे. आयओसीकडून कोणत्याही खेळाडूला दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे. अभिनव बिंद्राचा सन्मान करण्यात आल्यानंतर पीएम मोदींनी आनंद व्यक्त केला आणि त्याचे भरभरून कौतुकही केले.
अभिनव बिंद्राला ऑलिम्पिकमध्ये मिळाला हा बहुमान, पीएम मोदींनी केले कौतुक
अभिनव बिंद्रोला दोन दिवसांपूर्वी ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ देण्यात आली होती. आता देशाच्या पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन केले असून, संपूर्ण देशाला या यशाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. प्रथम एक खेळाडू म्हणून, नंतर एक अॅथलिट म्हणून त्यांनी क्रीडा आणि ऑलिम्पिक मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाची शान वाढवली होती. 28 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पाहण्याचा बहुमान मिळाला. याआधी भारतीय हॉकी संघाने 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. एवढेच नाही तर या विजयासह वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.
It makes every Indian proud that @Abhinav_Bindra has been awarded the Olympic Order. Congratulations to him. Be it as an athlete or a mentor to upcoming sportspersons, he has made noteworthy contributions to sports and the Olympic Movement.
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2024
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी मशाल रिले काढण्यात आली. त्यात भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राही सहभागी झाला होता. तो ऑलिम्पिक मशाल घेऊन लोकांमध्ये धावला.
𝐖𝐇𝐀𝐓. 𝐀. 𝐒𝐈𝐆𝐇𝐓. 😍
🎥 Watch India's first Olympic gold medallist, Abhinav Bindra, grace the #Paris2024 Olympic Torch Relay event! 🔥 pic.twitter.com/VQCEk0RgG2
— Olympic Khel (@OlympicKhel) July 24, 2024
अभिनव बिंद्रा व्यतिरिक्त, माजी भारतीय टेनिसपटू आणि 18 ग्रँड स्लॅम विजेता लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा नुकताच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. यात सहभागी होणारे हे दोन्ही खेळाडू पहिले आशियाई आहेत. पेसचा खेळाडूंच्या श्रेणीत, तर अमृतराजचा योगदान देणाऱ्यांच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.
