‘झलक दिखला जा’ हे गाणे जेव्हा वाजायचे, तेव्हा येत होती भूते? इमरान हाश्मीने पहिल्यांदा तोडले मौन


2006 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. नाव होते अक्सर. या चित्रपटातील ‘झलक दिखला जा’ हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. हे गाणे सर्वत्र ऐकू येत होते. हे गाणे इमरान हाश्मी, डिनो मोरिया आणि उदिता गोस्वामी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. त्यावेळी हे गाणे इतके लोकप्रिय झालं की देशात काही ठिकाणी ‘झलक दिखला जा’ वाजवल्यामुळे भूत येत असल्याच्या अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. आता हे गाणे रिलीज होऊन तब्बल 18 वर्षांनंतर इमरान हाश्मीने भूत अफवेवर मौन सोडले आहे.

‘द ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत इमरान हाश्मीला ‘झलक दिखला जा’ गाण्याशी संबंधित भूत अफवेबद्दल विचारण्यात आले. यावर इमरान हाश्मी म्हणाला, “मी देखील हे ऐकले आहे. आता भूत आले की नाही माहीत नाही. मी कधीही भूत पाहिले नाही. आपल्या देशात अनेक अफवा आहेत. अनेकांचा भुतांवर विश्वास असतो. म्हणूनच राज या चित्रपटानेही चांगली कमाई केली.

यादरम्यान इमरान हाश्मी म्हणाला की, मी अनेक हॉरर चित्रपट केले आहेत, पण मला कधीच भुताचा अनुभव आला नाही. तो म्हणाला की असे कधी झाले, तर मला भूत बघायला आवडेल. लोकांनी पाहिले असेल, तर मला पण दाखवा म्हणेन.

‘झलक दिखला जा’ हे गाणे त्यावेळी सुपरहिट झाले होते. समीर यांनी लिहिले होते. हे गाणे हिमेश रेशमियाने गायले असून त्याला संगीतही दिले आहे. हिमेश रेशमियाची गणना त्यावेळी देशातील टॉप गायकांमध्ये होते. त्याचे प्रत्येक गाणे सुपरहिट होत होते. हे गाणेही रिलीज होताच सर्वांच्या ओठांवर लोकप्रिय झाले. अक्सरचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले होते आणि हा चित्रपट 6 फेब्रुवारी 2006 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.