हा भारतीय खेळाडू T20 WC फायनलमध्ये प्रार्थना करत होता आफ्रिकेच्या विजयासाठी कारण आहे धक्कादायक


भारतीय क्रिकेट चाहते अजूनही टी-20 विश्वचषकाच्या विजयाच्या जल्लोषात मग्न आहेत. या विजयातून टीम इंडियाचे खेळाडूही अद्याप बाहेर आलेले नाहीत. त्याचवेळी, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 6 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी टी-20 विश्वचषकातील संस्मरणीय विजयावर आपले अनुभव शेअर केले आहेत.

बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खेळाडूंनी T20 विश्वचषकाच्या फायनलचा अनुभव शेअर केला आहे. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल काय म्हणाला, ते आता व्हायरल होत आहे. ध्रुव जुरेलने सांगितले की, जेव्हा मी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहत होतो, तेव्हा भारत जिंकेल अशी प्रार्थना करत होतो, पण त्यानंतर दक्षिण आफ्रिका विजयाकडे वाटचाल करत होती. मग मी दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रार्थना करु लागलो, जेणेकरून टीम इंडिया जिंकेल आणि नंतर भारतीय संघ फायनल जिंकला.


टीम इंडियामध्ये पहिल्यांदा निवड झालेल्या अभिषेश शर्माने या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याने युवराज सिंगसोबत टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहिला. टीम इंडिया जिंकल्यावर युवराज सिंग खूपच भावूक झाला होता. त्यामुळे अभिषेश शर्मालाही खूप प्रेरणा मिळाली आणि त्यालाही तो खूप आवडला आणि हा क्षण आपण कधीच विसरणार नाही, असेही त्याने सांगितले. यासोबतच तो म्हणाला की, आता त्यालाही टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून द्यायचा आहे.

शुभमन गिलला प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर या दौऱ्यासाठी काही युवा खेळाडूंचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, रियान पराग आणि तुषार देशपांडे हे खेळाडू पहिल्यांदाच टीम इंडियाचा भाग बनले आहेत. अशा परिस्थितीत या सर्व खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.