Bajaj Freedom CNG : महागड्या पेट्रोलपासून दिलासा! जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच, त्यात आहेत अनेक फीचर्स


बजाज ऑटोने जगातील पहिली CNG मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. जगातील या पहिल्या CNG बाइकचे नाव फ्रीडम आहे. बजाज ऑटोने या बाइकच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही आणि बाजारात आणण्यापूर्वी या बाइकने 11 वेगवेगळ्या सुरक्षा चाचण्या पार केल्या आहेत.

कंपनीने बजाज फ्रीडम सीएनजी बाईकच्या पाच खास वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे ती सर्वात खास आहे. पहिले समकालीन स्टाइलिंग, दुसरे नाविन्यपूर्ण टेक पॅकेजिंग, तिसरे मोठे सीट, चौथे मजबूत ट्रेलीस फ्रेम आणि पाचवे लिंक्ड मोनोशॉक. बजाज फ्रीडम सीएनजीच्या लॉन्चिंग कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सीएनजी दुचाकी चालवण्याची किंमत 1 रुपये प्रति किलोमीटर असेल.

बजाज ऑटोच्या या फ्रीडम सीएनजी बाइकमध्ये 2 किलोचा सीएनजी सिलेंडर आणि 2 लिटरची इंधन टाकी आहे. याशिवाय, कंपनीने उत्तम आरामासाठी लिंक्ड मोनोशॉकचा वापर केला आहे.

बजाज ऑटोने जगातील पहिली CNG बाईक ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 95 हजार रुपये आहे. ही बाईक 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली असून तुम्हाला ही बाईक तीन प्रकारात मिळेल. या बाईकचा बेस ड्रम व्हेरिएंट 95 हजार रुपये, ड्रम एलईडी व्हेरिएंट 1.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि टॉप डिस्क व्हेरिएंट 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सीएनजी सिलेंडर कुठे ठेवला आहे? कंपनीने सीएनजी सिलेंडर सीटखाली ठेवला आहे. ही बाईक किती किलोमीटर मायलेज देईल? ते आम्ही तुम्हाला सांगतो.

या बाइकमध्ये 125 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकते. बजाज ऑटोचा दावा आहे की या बाईकसह ग्राहकांना दोन्ही इंधनांवर एकूण 330 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल. पेट्रोलवरून सीएनजी आणि सीएनजीवरून पेट्रोलवर जाण्यासाठी बाइकमध्ये एक बटण देण्यात आले आहे, ज्यामुळे हे काम सोपे होईल.