
2007 मध्ये महेंद्रसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला होता. रोहित शर्माही त्या संघाचा एक भाग होता. मात्र, त्यानंतर तो एकही विश्वचषक जिंकू शकला नाही. जेव्हा त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले, तेव्हा त्याला 2022 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून त्याला कोणत्याही किंमतीत वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकायची होती. यासाठी त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत दोन वर्षे कठोर परिश्रम घेतले आणि एक मजबूत संघ तयार केला. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवानंतर आणि 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, जेव्हा त्याला बार्बाडोसमध्ये T20 विश्वचषक ट्रॉफी मिळाली, तेव्हा तो भावूक झाला आणि भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या खेळपट्टीची माती खाल्ली. आता बीसीसीआयच्या एका व्हिडिओमध्ये यामागचे खरे कारण स्पष्ट करण्यात आले आहे.
VIDEO : बार्बाडोसची खेळपट्टी आयुष्यभर विसरणार नाही रोहित शर्मा, सांगितले का खाल्ली त्याची माती?
💬💬 𝙄𝙩 𝙝𝙖𝙨𝙣'𝙩 𝙨𝙪𝙣𝙠 𝙞𝙣 𝙮𝙚𝙩
The celebrations, the winning gesture and what it all means 🏆
Captain Rohit Sharma takes us through the surreal emotions after #TeamIndia's T20 World Cup Triumph 👌👌 – By @Moulinparikh @ImRo45 | #T20WorldCup pic.twitter.com/oQbyD8rvij
— BCCI (@BCCI) July 2, 2024
बीसीसीआयने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माने T20 वर्ल्ड कप विजयाचा अर्थ आणि सेलिब्रेशनच्या पद्धतीबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले की, विजयानंतर त्याला कसे वाटत आहे, हे सांगणे कठीण आहे. माती खाऊन सेलिब्रेशन करण्याबाबत रोहितने सांगितले की, त्या क्षणी मनात जे वाटले, ते केले. सामन्यानंतर जेव्हा तो खेळपट्टीवर पोहोचला, तेव्हा त्याला जाणवले की बार्बाडोसच्या खेळपट्टीने त्याचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याला जीवनातील प्रत्येक सुख दिले आहे. म्हणूनच त्याला ते स्वतःमध्ये ग्रहण करायचे होते. त्यामुळेच त्याने त्या खेळपट्टीची माती खाल्ली. बार्बाडोसचे मैदान आणि खेळपट्टी आयुष्यभर विसरणार नाही, असे रोहितने सांगितले.
रोहित शर्माने व्हिडिओमध्ये खुलासा केला की, ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याने इतर खेळाडूंसोबत खूप मजा केली. हॉटेल्समध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर त्याला ती ट्रॉफी मिळाली होती, त्यामुळे त्या आनंदात त्याला रात्रभर झोपही आली नाही. या आनंदासाठी रात्रभर जागे राहण्यात काहीच अडचण नसल्याचे रोहितने सांगितले.
