VIDEO : रोहित शर्माचे तसे बोलणे हारिस रौफ आणि रिझवानच्या ‘कानशिला’त लगावल्यासारखे !


हारिस रौफ सध्या पाकिस्तानी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. मात्र, कोणत्याही भारतीय चाहत्याला त्याच्या चर्चेशी काही देणेघेणे नाही. असे असतानाही रौफ आणि मोहम्मद रिझवान यांनी ज्या प्रकारे भारताचे नाव एका घटनेत ओढले ते अतिशय लाजिरवाणे होते. त्या व्यक्तीची माहिती न घेता दोन्ही खेळाडूंनी त्याला भारतीय असल्याचे घोषित केले होते. यावरून त्याची भारतीय चाहत्यांबाबतची विचारसरणी दिसून येते. दरम्यान, रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानी चाहत्यांचे खूप कौतुक केले आहे. रोहितचे हे वक्तव्य रौफ आणि रिजवानच्या कानशिलात लगावण्यापेक्षा कमी नाही.


रोहित शर्मा काही वेळापूर्वी दुबई आय या टॉक शोमध्ये गेला होता. यावेळी तो पाकिस्तानी चाहत्यांबद्दल बोलला. त्याने पाकिस्तानी चाहत्यांचे खूप कौतुक केले. रोहितने सांगितले की, जेव्हा भारतीय संघ ब्रिटनमध्ये असतो, तेव्हा पाकिस्तानी चाहते येतात आणि त्यांना खूप प्रेम आणि आदराने भेटतात. जेव्हा पाकिस्तानी चाहते येतात आणि त्यांच्या खेळाचे कौतुक करतात आणि खेळाडूंचा आदर करतात, तेव्हा सगळ्यांना खूप बरे वाटते.


पाकिस्तानी संघ टी-20 विश्वचषकातून लज्जास्पदपणे बाहेर पडला आहे. आता संघाचे खेळाडू मैदानाबाहेर आपल्या वागण्याने स्वतःला लाजवत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने एका क्रिकेट चाहत्याला भारतीय म्हणत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्याची बायको त्याला थांबवते, पण तो मान्य करत नाही आणि मारायला धावतो. दोघांमध्ये तू-तू-मैं-मैं होते. यादरम्यान रौफ त्या चाहत्याला म्हणतो, ‘तू भारतीय असशील’. यावर तो लगेच स्वतःला पाकिस्तानी म्हणवून त्यांना लाजवतो.

रौफच्या समर्थनार्थ उतरलेल्या पाकिस्तानी संघाचे यष्टिरक्षक फलंदाज सत्य जाणून न घेता त्याला भारतीय म्हणत भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा चाहत्याचे सत्य समोर येते आणि लोक त्याला ट्रोल करू लागतात, तेव्हा तो म्हणतो की तो चाहता भारतीय असो की पाकिस्तानी याने काही फरक पडत नाही. त्यांनी खेळाडूंचा आदर केला पाहिजे.