काय आहे डिझेलपासून बनवलेल्या पराठ्याचे सत्य, तुम्हीच पाहा VIDEO मध्ये


नुकताच चंदीगडमधील एका ढाब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये बबलू नावाच्या व्यक्तीने दावा केला होता की, तो लोकांना वाहनांमध्ये वापरण्यात येणारे इंधन डिझेलमध्ये बनवलेले पराठे खाऊ घालतो आणि ते मोठ्या चवीने खातात. हे एका फूड व्लॉगरने शेअर केले होते. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये बबलू ‘डिझेल पराठा’ बनवल्याचे सांगत होता. आता या व्हायरल दाव्याचे सत्यही समोर आले आहे. ढाब्याच्या मालकाचे म्हणणे आहे की, हा दावा खोटा असून तो केवळ गंमत म्हणून चित्रित करण्यात आला होता.

या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, ढाबा मालक चन्नी सिंहचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणतो, डिझेल पराठा असे काहीही नाही. डिझेलमध्ये शिजवलेला पराठा कोणी कसा खाऊ शकतो, ही सामान्य बाब आहे आणि आपण असे पदार्थ कोणालाही देत ​​नाही.

हे ब्लॉगरच्या विचारांची उपज होती : ढाबा मालक
ढाबा मालकाने पुढे सांगितले की हे व्लॉगरने केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवले होता. तो म्हणतो की जेव्हा व्लॉगरला त्याची चूक समजली, तेव्हा त्याने त्याबद्दल माफीही मागितली.

ढाबा मालकाचा व्हिडिओ येथे पहा


‘आम्ही लोकांच्या जीवाशी खेळत नाही’
ढाबा मालकाने डिझेलमध्ये शिजवलेल्या अन्नाचे व्हायरल दावे फेटाळले आणि आश्वासन दिले की त्याच्या ठिकाणी फक्त निरोगी अन्न दिले जाते. ते म्हणाले, आम्ही कोणाच्या जीवाशी खेळत नाही. ढाब्यावर फक्त खाद्यतेल वापरले जाते. आम्ही लंगर देखील पुरवतो. आता तो व्हिडिओ पाहा, ज्याने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवून दिली.

डिझेल पराठ्याचा तो व्हिडिओ, ज्याने उडवून दिली होती खळबळ