Operation Amanat : ट्रेनमध्ये विसरलात चार्जर किंवा इतर काही सामान, येथे मिळेल सर्वकाही


तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. प्रवासादरम्यान, जेव्हा लोकांना स्टेशनवर पोहोचण्याची घाई असते, तेव्हा ते त्यांच्या महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू ट्रेनमध्येच विसरतात. नंतर, जेव्हा आपल्याला आठवण येते, तेव्हा आपण इकडे-तिकडे सामान शोधू लागतो, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि आपल्याला फक्त निराशाच मिळते.

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेचे नाव मिशन अमानत आहे. ऑपरेशन अमानत म्हणजे काय आणि हरवलेल्या मालाची माहिती कशी मिळेल? ते आम्ही तुम्हाला सांगतो.

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी ऑपरेशन अमानत सुरू केले आहे. या मिशनमुळे आतापर्यंत लाखो लोकांना त्यांचे सामान परत करण्यात आले आहे. सापडलेल्या वस्तूंचे फोटो आणि तपशील पश्चिम रेल्वेच्या अधिकृत साइटवर शेअर केले आहेत.

सर्वप्रथम तुम्हाला https://wr.indianrailways.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला पॅसेंजर आणि फ्रेट सर्व्हिसेस विभागात ऑपरेशन अमानतवर क्लिक करावे लागेल.

ऑपरेशन अमानत वर टॅप केल्यानंतर, तुम्हाला ही सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व विभागांची नावे दिसतील. मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर विभागात ही सुविधा उपलब्ध आहे. विभागाच्या नावावर क्लिक केल्यास तुमच्यासमोर एक फाईल उघडेल ज्यामध्ये तारखेसह सापडलेल्या मालाचा तपशील दिसेल.

या साइटद्वारेच तुम्हाला हरवलेल्या सामानाची माहिती मिळू शकते. जर तुमचे सामान चोरीला गेले असेल, तर तुम्हाला वेगळी तक्रार द्यावी लागेल. जर मिळालेला माल तुमचा असेल, तर तुम्हाला तो माल तुमचाच असल्याचा पुरावा द्यावा लागेल, तरच तुम्ही मालावर दावा करू शकाल. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला माल मिळेल.