पराठा बनवत आहे कि कॅन्सरची रेसिपी? व्हायरल व्हिडिओ पाहून संतापले लोक


आपल्या भारतीयांना नाश्त्यात जर एखादी गोष्ट सर्वात जास्त खायला आवडत असेल, तर ती म्हणजे पराठा. हिवाळा असो की उन्हाळा, प्रत्येकजण पराठा मोठ्या उत्साहाने खातात. ते बनवण्यासाठी काहीजण तूप तर काही लोणी वापरतात. पण चंदीगडमधील एका ढाब्यावरील व्यक्तीने आश्चर्यकारक गोष्ट केली. दुकानदाराने पराठे अशा पद्धतीने बनवले की लोकांनी त्याला ‘डिझेल पराठा’ असे नाव दिले. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

आता याला डिझेल पराठा का म्हटले जात आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, ढाबा मालकाने ज्या तेलात पराठा तळला होता, ते तेल अनेक वेळा वापरले गेले होते. त्यामुळे तेलाचा रंग डांबरासारखा काळा दिसू लागला. कल्पना करा की लोक निरोगी राहण्यासाठी तेलकट पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवतात, अशा परिस्थितीत या ढाब्यावर तयार केलेला पराठा कोणी खाल्ला तर काय होईल. एवढेच नाही तर बबलू नावाचा हा दुकानदार अभिमानाने सांगतो की जर तुम्हाला त्याच्या पराठ्याची चव आवडत नसेल, तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता.


हा व्हिडिओ प्रथम X हँडल @nebula_world वर शेअर करण्यात आला होता, परंतु आता तो डिलीट केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले होते, पेट्रोल डिझेलसोबत पराठा. कॅन्सरची हीच खरी रेसिपी आहे. व्हायरल झालेल्या क्लिपने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर संतप्त इंटरनेट वापरकर्त्यांनी FSSAI ला टॅग केले आणि संबंधित ढाबा मालकावर योग्य कारवाईची मागणी केली.


मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनही अॅक्शन मोडमध्ये आले आणि ढाबा मालकावर कारवाई करण्यात आली. @nebula_world ने अपडेट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की मूळ ट्विट काढून टाकण्यात आले आहे, परंतु व्हायरल व्हिडिओच्या आधारे दुकानदारावर पुरेशी कारवाई करण्यात आली आहे.