Video : जसप्रीत बुमराहने 8 कोटीच्या खेळाडूची केली अशी अवस्था, जे पाहून फलंदाजांचा उडेल थरकाप


आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास झाली नाही, परंतु त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या उजव्या हाताच्या तुफानी वेगवान गोलंदाजाने आपल्या धारदार चेंडूंच्या जोरावर आयपीएलमधील सर्व विरोधी फलंदाजांचे जगणे कठीण केले आहे. पंजाब किंग्जविरुद्धही त्याने असेच काहीसे केले. बुमराहने पंजाबचा स्फोटक फलंदाज रिले रुसोला अशा प्रकारे बाद केले की जगभरातील फलंदाजांचा थरकाप उडेल. बुमराहने रुसोला असा चेंडू टाकला, ज्याचे उत्तर कोणत्याही फलंदाजाकडे नसेल.

सलामीवीर जॉनी बेअरस्टोच्या खराब फॉर्ममुळे हैराण झालेल्या पंजाब किंग्जने रिले रुसोचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. पंजाबने रुसोवर 8 कोटी रुपये खर्च केले होते, पण हा खेळाडू या मोसमात पहिल्याच सामन्यात सपशेल अपयशी ठरला. मात्र, यात रुसोचाही दोष नव्हता कारण बुमराहचा चेंडू अप्रतिम होता. बुमराह आक्रमणावर आला, तेव्हा रुसोने फक्त 2 चेंडू खेळले होते आणि त्यानंतर या खेळाडूने असे इन-स्विंग यॉर्कर टाकला की पंजाबच्या फलंदाजाचे दोन स्टंप उडून गेले. बुमराहचा हा चेंडू शेवटच्या क्षणी स्विंग झाला आणि रुसो बघतच राहिला.


रुसोला बाद केल्यानंतर बुमराहने सॅम कुरनला आपला शिकार बनवले. पंजाब किंग्जचा कर्णधारला बुमराहने इशान किशनकरवी झेलबाद केले. या लीगमध्ये बुमराह चांगली गोलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेटही प्रति षटकात 6 धावांपेक्षा कमी होता. बुमराह इतका चांगला फॉर्ममध्ये असणे टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. यूएसए-वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून टी-20 विश्वचषक होणार असून टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात बुमराह महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.