
जर तुम्हाला स्वतःसाठी लॅपटॉप घ्यायचा असेल, पण बजेट तुम्हाला साथ देत नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा लॅपटॉप तुम्ही कुठून आणि कसा खरेदी करू शकता ते येथे जाणून घ्या. याशिवाय या लॅपटॉपमध्ये तुम्हाला कोणते फिचर्स मिळतील?

(Refurbished) Lenovo ThinkPad
7व्या जनरेशनचा 8 GB DDR4 RAM/256 GB SSD/14 इंच लॅपटॉप विंडो 11 सह येतो. या लॅपटॉपची किंमत जरी 89,990 रुपये आहे, परंतु तुम्हाला तो Amazon वर 17,990 रुपयांना मिळत आहे. या लॅपटॉपवर मालकाकडून 6 महिन्यांची वॉरंटीही देण्यात आली आहे.

(Refurbished) Lenovo IdeaPad
तुम्हाला 11.6 इंच डिस्प्ले, 4GB/256GB SSD स्टोरेज आणि Windows 11 सह लॅपटॉप अतिशय स्वस्त किंमतीत मिळत आहे. त्याची किंमत 28,990 रुपये असली, तरी तो तुम्हाला Amazon वर 18,990 रुपयांना मिळत आहे.

(Renewed) HP Chromebook C640
तुम्हाला फक्त 16,799 रुपयांमध्ये 10व्या जनरेशनचा हा लॅपटॉप मिळत आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तो नो कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता, तुम्हाला त्याच्या मासिक EMI साठी फक्त 814 रुपये द्यावे लागतील. हा लॅपटॉप टचस्क्रीन फीचरसह येतो.

(Renewed) DELL Latitude
Dell चा हा 14 इंच लॅपटॉप तुम्हाला फक्त 21,974 रुपयांना मिळत आहे. तुम्ही Windows 11 (अपग्रेड केलेला) लॅपटॉप नो कॉस्ट EMI देखील खरेदी करू शकता. त्याचा मासिक ईएमआय फक्त 1,065 रुपये असेल.

ASUS VivoBook 15
जरी या लॅपटॉपची मूळ किंमत 33,990 रुपये असली, तरी तुम्ही Amazon वरून 38 टक्के सूट देऊन फक्त 20,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा लॅपटॉप वर नमूद केलेल्या लॅपटॉपसारखा सेकंड हँड नाही.
