IPL 2024 : चुकीच्या खेळामुळे हरली आरसीबी? फाफ डू प्लेसिसने पॅट कमिन्सला सांगितली संपूर्ण कहाणी


पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आरसीबीची कामगिरी खराब झाली आहे. या हंगामातही या संघाने 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादकडून सहावा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 287 धावा केल्या. पाठलाग करताना आरसीबीनेही 262 धावा केल्या, हैदराबादला चांगली झुंज दिली, पण शेवटी पराभव पत्करावा लागला. मात्र, या सामन्यापूर्वी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने असे काही केले, जे चर्चेचा विषय बनले आहे. हैदराबादविरुद्धच्या नाणेफेकीदरम्यान तो पॅट कमिन्ससोबत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावर चर्चा करताना दिसला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीत झालेल्या कथित हेराफेरीबाबत तो बोलत होता.


फाफ डू प्लेसिस खरेतर पॅट कमिन्सला सांगत होता की मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान रेफ्री जवागल श्रीनाथ यांनी नाणेफेक करून नाणे उचलले होते. याचा अर्थ, आरसीबीने नाणेफेक जिंकली, असे डू प्लेसिसला म्हणायचे होते, परंतु श्रीनाथने नाणे उचलले आणि ते पलटवले, त्यानंतर मुंबईला विजेता घोषित करण्यात आले. या सामन्यात मुंबईने पाठलाग केला आणि आरसीबीने एकतर्फी सामना गमावला. मात्र, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि असे असतानाही संघाचा पराभव झाला.

चिन्नास्वामीच्या पाटा खेळपट्टीवर आरसीबीच्या गोलंदाजांनी अत्यंत खराब गोलंदाजी केली. हैदराबादचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने अवघ्या 41 चेंडूत 102 धावा केल्या. अभिषेक शर्माने 22 चेंडूत 34 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा केल्या आणि मार्करामने 17 चेंडूत 32 धावा केल्या आणि अब्दुल समदने 10 चेंडूत नाबाद 37 धावा करून हैदराबादची धावसंख्या 287 धावांपर्यंत नेली. RCB च्या 4 गोलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा दिल्या, जे T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.

आरसीबीने हैदराबादच्या गोलंदाजांनाही झोडपून काढले. विराट कोहलीने 20 चेंडूत 42 धावा, कर्णधार डुप्लासने 28 चेंडूत 62 धावा केल्या. पण विल जॅक, रजत पाटीदार, सौरव चौहान मधल्या फळीत अपयशी ठरले. यानंतर दिनेश कार्तिकने 35 चेंडूत 83 धावा करत सामना रोमांचक स्थितीत नेला, पण तो आऊट होताच आरसीबीला सामना गमवावा लागला.