महिला वेटरच्या व्हिडिओने इंटरनेटवर उडवून दिली खळबळ, तिच्या रोबोटिक हालचाली पाहून लोक झाले थक्क


चायनीज रेस्टॉरंटमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये महिला वेटरने ग्राहकांना जेवण देण्याच्या शैलीने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओमध्ये महिला वेटरला ‘ह्युमनॉइड रोबोट’ रुपात दाखवण्यात आले आहे. वेटरच्या अभिव्यक्तीनुसार, ती खरी स्त्री आहे, असे तुम्हाला वाटणार नाही. कारण, तिच्या चालण्यापासून ती ज्या पद्धतीने बोलते, ते पाहता ती एखाद्या रोबोसारखेच दिसते.

हा व्हिडिओ चीनच्या ‘चोंगकिंग हॉटपॉट रेस्टॉरंट’मधला असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेची ओळख रेस्टॉरंटची मालक अशी झाली असून, ती एक व्यावसायिक नृत्यांगना देखील आहे. असा दावा केला जात आहे की, ही महिला अगदी रोबोटसारखा आवाज काढून बोलते. ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने ध्वनी निर्माण झाला आहे.


बालकृष्णन नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, हे जेवणाचे भविष्य आहे. या महिलेने केवळ रोबोटिक हालचालींमध्येच प्रभुत्व मिळवले नाही, तर AI सारखा आवाज काढण्यासाठी तिच्या आवाजाचे प्रशिक्षणही घेतले आहे.

अवघ्या काही सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वेटर ही रोबोट नसून एक महिला आहे, हे माहीत असूनही तिची हालचाल पाहून लोकांचा गोंधळ उडाला आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की, जर तुम्ही पैसे न देता पळून गेलात, तर ती तुम्हाला इन्स्पेक्टरप्रमाणे पकडेल आणि नंतर मारहाण करेल. त्याचवेळी आणखी एका यूजरने आश्चर्य व्यक्त करत विचारले की, हा माणूस आहे की रोबोट? दुसरा वापरकर्ता म्हणतो, मला अशा रेस्टॉरंटमध्ये जायला आवडणार नाही, जिथे माणसांऐवजी रोबोट काम करतात.