Video : सूर्यकुमार यादवने दुहेरी भूमिकेत मारली एंट्री, एमआयमध्ये येताच संघांना दिला कडक इशारा


आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली, परिणामी मुंबईने पराभवाची हॅट्ट्रिक साधली. एकीकडे गोलंदाजी अपयशी ठरत असल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे हैदराबाद वगळता कोणत्याही सामन्यात फलंदाजीही कामी आली नाही. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्ससमोर 169 धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. राजस्थानविरुद्ध, संपूर्ण संघ केवळ 125 पर्यंत मर्यादित राहिला होता. टॉप-4 पैकी 3 बॅट्समन गोल्डन डक बनले होते. आता संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (NCA) ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव संघात सामील झाला आहे. टीममध्ये सामील झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने सूर्याचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहून चाहते आनंदी झाले आहेत.

33 वर्षीय सूर्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पुढील सामन्याच्या तयारीसाठी संघाच्या सराव सत्रात सामील झाला. यानंतर तो हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे तो स्वतःशीच बोलताना दिसला. मुंबई इंडियन्सने सूर्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो दोन अवतारांमध्ये दिसत आहे. सूर्याचे हे दोन्ही अवतार एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. या संवादादरम्यान सूर्याने इतर संघांना हातवारे करून इशारा दिला.

सूर्यकुमार यादवची ही शैली चाहत्यांना खूप आवडते. वृत्त लिहिपर्यंत, व्हिडिओ पोस्ट केल्याच्या 3 तासांत या रीलला 1 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला उत्साह व्यक्त केला. अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला उत्साह व्यक्त केला. एका यूजरने लिहिले, मजा येईल भिडू. दुसऱ्या युजरने लिहिले की, प्रतीक्षा संपली आहे. तर भारत आर्मीने SKY is back असे लिहिले आहे.


सूर्या मुंबईच्या पुढील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. espncricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव शुक्रवारी संघात सामील झाला आणि नेटमध्ये सुमारे एक तास फलंदाजी केली. याशिवाय त्याने आपल्या सहकाऱ्यांचीही भेट घेतली. सराव सत्रादरम्यान सूर्याने मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर आणि फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यांच्याशीही त्याच्या फलंदाजीबद्दल चर्चा केली.

आम्ही तुम्हाला सांगूया की सूर्यकुमार यादव शेवटचा डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळला होता. जिथे कर्णधार असताना त्याने 56 चेंडूत शतक झळकावले. या मालिकेत त्याला घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला स्पोर्ट्स हर्नियाचा त्रास झाला, त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे मुंबई संघाला यंदाच्या मोसमात चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंत मुंबईचा एकही फलंदाज फॉर्मात दिसलेला नाही. आता त्याच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत होईल. संघाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मुंबईला त्याच्या 360 डिग्री चौकार आणि षटकारांची नितांत गरज आहे. सूर्याने आयपीएलच्या 139 सामन्यांच्या 124 डावांमध्ये 3249 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 21 अर्धशतकांचाही समावेश आहे. आयपीएलमध्ये सूर्या 32 च्या सरासरीने आणि 143.32 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो.