Mirzapur 3 Video : घ्या आली मिर्झापूर 3 ची पहिली झलक, दिसला गुड्डू पंडित आणि कालिन भैय्याचा डॅशिंग अंदाज!


पंकज त्रिपाठी, अली फजल, विजय वर्मा, रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी अभिनीत मिर्झापूर 3 या वेब सिरीजची पहिली झलक समोर आली आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने मंगळवारी त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. येत्या काही दिवसांत प्राइम व्हिडिओवर सुमारे 70 चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. प्राइम व्हिडिओने आपल्या प्रोजेक्ट्सचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची झलकही दाखवण्यात आली आहे.

चाहते अनेक दिवसांपासून पंकज त्रिपाठी आणि अली फजलच्या मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. या सिरीजचा पहिला सीझन 2018 मध्ये आणि दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. मात्र, तिसऱ्या सीझनसाठी चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागली आहे. आता निर्मात्यांनी त्याच्या तिसऱ्या सीझनची पहिली झलक दाखवली आहे.

प्राइम व्हिडिओच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच कालिन भैयाची झलक दाखवण्यात आली आहे. धबधब्याच्या काठी उभा राहून कालिन भैया म्हणतो, तूम्ही आम्हाला विसरले तर नाही ना. व्हिडिओमध्ये अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विजय वर्मा आणि ईशा तलवार यांसारख्या कलाकारांची झलकही दाखवण्यात आली आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला अली फजलचे पात्र गुड्डू पंडित दाखवले आहे. गुड्डू पंडित आपल्या घाणेरड्या शैलीत लोकांना सांगतो, शहर आपल्याला काय म्हणतेत? ज्याच्या उत्तरात समोर उभा असलेला जमाव म्हणतो, “गुड्डू भैया.”

डिसेंबर 2022 मध्येच अली फजलने मिर्झापूर 3 चे शूटिंग पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. मात्र, आता तो रिलीज झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. प्राइम व्हिडिओच्या कार्यक्रमात अली फजल म्हणाला की, तिसरा सीझन पहिल्या सीझनसारखा असेल. याशिवाय या सीझनमध्ये काही नवीन व्यक्तिरेखा पाहायला मिळणार असून काही जुन्या पात्रांची कथा संपणार असल्याचेही त्याने सांगितले.