‘शक्तिमान’ संदर्भात मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगला फटकारले, आता हटवले इंस्टाग्राम पोस्ट आणि यूट्यूब व्हिडिओ


गेल्या काही काळापासून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध टीव्ही शो ‘शक्तिमान’वर चित्रपट बनणार असल्याच्या बातम्या येत आहेत. रणवीर सिंग या चित्रपटात शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, शक्तिमानच्या संदर्भात सुरू असलेल्या बातम्यांचा हवाला देत टीव्हीवरील शक्तिमान म्हणजेच मुकेश खन्ना यांनी एक व्हिडिओ बनवला आणि रणवीर सिंगवर जोरदार निशाणा साधला. पण आता मुकेश खन्ना यांनी त्यांची इन्स्टाग्राम पोस्ट आणि यूट्यूब व्हिडिओ हटवला आहे.

यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवरही, त्यांचा व्हिडिओ ज्यामध्ये त्यांनी रणवीर सिंगला फटकारले आहे, तो कुठेही दिसत नाही. मुकेश खन्ना यांनी इंस्टाग्रामवर शक्तिमान संदर्भात सुरू असलेल्या बातम्यांवर संताप व्यक्त करताना लिहिले होते की, सोशल मीडिया अनेक महिन्यांपासून रणवीर सिंग शक्तिमान होणार असल्याच्या अफवांनी भरलेला आहे. या बातम्यांमुळे सर्वजण संतप्त झाल्याचा दावा त्यांनी केला.

मुकेश खन्ना यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी गप्प राहिलो. पण जेव्हा चॅनलने रणवीर सिंगला साइन केल्याची घोषणाही सुरू केली. त्यामुळे मला तोंड उघडावे लागले आणि मी म्हणालो की अशी प्रतिमा असलेला माणूस कितीही मोठा स्टार असला, तरी तो शक्तिमान होऊ शकत नाही.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये रणवीरवर टीका केली होती. रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचा संदर्भ देत त्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, जर त्याला हे सर्व आवडत असेल, तर त्याने दुसऱ्या देशात जावे. याशिवाय मुकेश खन्ना यांनी रणवीरच्या फोटोशूटला सपोर्ट करणाऱ्या लोकांवरही निशाणा साधला.

दरम्यान शक्तिमान बाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. शक्तिमानवर चित्रपट बनतोय की नाही याबाबत तूर्तास काही सांगता येणार नाही, पण हो, रणवीर सिंग मिनल मुरली दिग्दर्शक बासिल जोसेफसोबत सुपरहिरो चित्रपट करणार आहे, हे मात्र नक्की. बॉलीवूड हंगामाने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले होते की, बेसिलने स्क्रिप्ट तयार केली आहे. हा ॲक्शनपेक्षा भावनिक चित्रपट असेल. मात्र, या चित्रपटात रणवीर सुपरहिरो असणार असून, तोही उडणार आहे.